Post office yojana: फक्त ₹50,000 गुंतवा आणि मिळवा ₹13.5 लाख! पोस्ट ऑफिसची योजना नेमकी काय आहे?

Post office yojana: जर तुम्ही विचार करत असाल दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुक करण्याचा तर ही पोस्ट ऑफिस योजना म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. दरवर्षी फक्त ₹50,000 गुंतवून तुम्ही लाखो रुपये परत मिळवू शकता. महागाईच्या काळात ही योजना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची आर्थिक ताकद बनू शकते.चला, पाहूया ही योजना नेमकी काय आहे आणि यातून लाखों रुपये कसे मिळतात?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरकारच्या गॅरंटी असलेली दीर्घकालीन बचत योजना आहे. यात तुम्ही सुरुवातीला जरी कमी रक्कम गुंतवली तरी, वेळेनुसार त्यावर व्याज जमा होत राहते आणि शेवटी मोठा नफा मिळतो.त्यामुळे कोणताही जोखीम न घेता आपला पैसा वाढत राहतो.योजना केंद्र सरकारतर्फे चालवली जाते आणि यामध्ये गुंतवलेले पैसे संपूर्णपणे सुरक्षित असतात.

दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक प्रदान करणे हा पोस्ट ऑफिसच्या PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ) योजनेचा उद्देश आहे.ज्यांना शेअर मार्केट, प्रायव्हेट स्कीम्स किंवा विमा यामध्ये गुंतवणुकीचा धोका वाटतो, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.

योजनेची खास वैशिष्ट्ये

  1. कंपाउंड इंटरेस्टचा फायदा: व्याज दर सतत वाढत राहतो.
  2. लाँग टर्म सेव्हिंग: भविष्यासाठी मजबूत बचत योजना.
  3. लवकर पैसे काढता येतात: गरजेप्रमाणे काही वर्षांनंतर अंशतः पैसे काढता येतात.
  4. सरकारची हमी: पूर्णपणे सुरक्षित योजना.
  5. कर सवलत: गुंतवणुकीवर आणि परताव्यावर दोन्ही ठिकाणी
  6. करमुक्ती (80C अंतर्गत).

₹50,000 वरून ₹13.5 लाख कसे?

जर तुम्ही दरवर्षी ₹50,000 PPF खात्यात गुंतवत राहिलात (15 वर्षांसाठी),आणि सध्याचा व्याजदर (सुमारे 7.1% वार्षिक) असाच राहिला,तर 15 वर्षांनंतर तुम्हाला ₹13,56,070 इतकी मोठी रक्कम मिळू शकते.म्हणजे तुम्ही गुंतवणूक ₹7,50,000 करायची आहे.तुम्हाला व्याज ₹6,06,070 मिळेल आणि तुमचा एकूण परतावा ₹13,56,070 मिळणार आहे.

खाते उघडण्याची प्रक्रिया

तुम्हाला फॉर्म भरून, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि पत्त्याचा पुरावा (उदा. लाईट बील, बँक स्टेटमेंट) सादर करून खाते सुरू करू शकाल.PPF खाते उघडणे अत्यंत सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.

आजकाल हे सगळं घरबसल्या ऑनलाइन किंवा मोबाईल बँकिंगद्वारेही शक्य झाले आहे.खाते उघडल्यानंतर तुम्ही दरवर्षी एकदाच गुंतवणूक करू शकता किंवा हप्त्यांमध्ये रक्कम भरू शकता. भारतातील कुठलाही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.फक्त एकाच नावाने PPF खाते उघडता येते.पालक त्यांच्या मुलांचं खातेही उघडू शकतात.

निष्कर्ष: गुंतवणूक करायच्या आधी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. पीपीएफ योजनेतील नियम, व्याजदर आणि अटी काळानुसार बदलू शकतात.वरील लेख माहितीच्या उद्देशाने लिहिण्यात आलेला आहे.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment