डेली VS मंथली SIP: कोणता SIP तुमच्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक मार्ग? जाणून घ्या 5–15 वर्षात उभारी घेणारी पद्धत!

डेली VS मंथली SIP: आताचे युग हे गुंतवणुकीचे युग आहे त्यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण जेव्हा गोष्ट नियमित गुंतवणुकीची येते तेव्हा SIP (Systematic Investment Plan) ही पद्धत सर्वात उत्तम आहे.SIP मधून तुम्ही दर महिन्याला किंवा दररोज थोडीथोडी रक्कम गुंतवून मोठी रक्कम उभा करू शकता. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डेली SIP आणि मंथली SIP यामध्ये नेमकी कोणती पद्धत आपल्यासाठी योग्य ठरेल? चला तर मग जाणून घेऊ आपल्यासाठी योग्य आणि सोपी पद्धत कोणती आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

WEEKLY SIP ची मर्यादा

भटनागर बोलतात की सारखी सारखी गुंतवणूक केल्याने गुंतवणुकीचा जो मुख्य उद्देश आहे त्याला गोल-बेस्ट अप्रोच विसरला जाऊ शकतो.Weekly SIP मुळे गुंतवणूकदारांना जास्त एंट्री पॉइंट्स मिळतात, जे बाजारातील अस्थिरतेच्या काळात थोडी फार मदत करू शकतात. विशेषतः जेव्हा गुंतवणुकीसाठी कोणताही ठोस फ्रेमवर्क नसेल तसेच Weekly SIP मुळे तुमचे ट्रांजेक्शन जास्त होतात आणि ट्रॅक करायला अधिक अवघड जाते.

डेली SIP

भटनागर यांना वाटते की, फ्रीक्वेन्सी ही केवळ एक टॅक्टिकल बाब आहे. खरे यश मिळते ते योग्य गुंतवणूक करणे व त्यात सातत्य ठेवून बाजारातील चढ-उतारातही शांत राहणे.5 ते 10 वर्षांच्या कालावधीत Daily, Weekly आणि Monthly SIP च्या रिटर्नमध्ये फारसा मोठा फरक दिसून येत नाही.
ClearTax च्या एका अभ्यासानुसार, Daily SIP मुळे थोडे अधिक चांगले Cost Averaging होऊ शकते.

मंथली SIP

मंथली SIP ही सर्वसामान्य पद्धत आहे. यामध्ये दर महिन्याला एक ठराविक तारखेला ठराविक रक्कम गुंतवतात उदाहरणार्थ, दर महिन्याच्या 1 तारखेला ₹5000 गुंतवू शकता.

शिस्त आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट

मयंक भटनागर हे FinEdge या कंपनीचे सह-संस्थापक आणि COO आहेत. त्यांचं असं मत आहे की ,दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्ट असणे, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आणि बाजारातील चढ-उतार असूनसुद्धा सातत्याने गुंतवणूक करत राहणे. पुढे ते असेही बोलतात की, फ्रिक्वेन्सी म्हणजे महिन्याला, आठवड्याला किंवा दररोज गुंतवणूक करत राहणे पण यामध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक सर्वात महत्त्वाची आहे.

लांब काळात योग्य आणि साधी पद्धत

डेटा सांगतो की, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी Monthly SIP हा सर्वात स्थिर आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराने जर 15 वर्षांसाठी दर महिन्याला ₹20,000 SIP केली आणि स्थिर परतावा मिळाला, तर त्याची एकूण गुंतवणूक ₹1.25 कोटींपर्यंत पोहोचू शकते.ही कमाल फ्रीक्वेन्सीमुळे नाही, तर सातत्यामुळे साध्य होत असते.

SIP प्रकार =सरासरी रिटर्न (15 वर्षे) =सोय =ट्रॅक करणे

डेली SIP =जवळजवळ✓ सारखाच✓ गुंतागुंतीचा ✓कठीण
विकली SIP =जवळजवळ ✓सारखाच ✓मध्यम✓ मध्यम
मंथली SIP= स्थिर आणि सोपा✓ सोयीस्कर✓ सोपा

निष्कर्ष: अशाप्रकारे जर तुमचा उद्देश भविष्यकाळासाठी फायदेशीर गुंतवणूक करण्याचा असेल तर मासिक SIP हेच योग्य पाऊल ठरेल.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment