Bajaj CNG Bike: पेट्रोलचा ताण कमी करा, बजाजची CNG बाईक घ्या फक्त ₹85.9k

Bajaj CNG Bike 2025:सध्या वाढत्या पेट्रोल दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडत आहे. यावर पर्याय म्हणून बाजारात आलेली Bajaj Freedom 125 CNG बाइक म्हणजे एक उत्तम उपाय! बजाजने नुकतीच ही दुहेरी इंधन प्रणालीवर चालणारी मोटरसायकल लॉन्च केली आहे आणि तिची किंमत फक्त ₹85,976 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते – जी किंमत पाहता खरोखरच किफायतशीर वाटते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bajaj CNG बाईकची वैशिष्ट्ये पहा

फीचर्स बाबत- जाज फ्रीडम 125 मध्ये एलईडी हेडलाइट, ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, गियर पोझिशन इंडिकेटर, कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम, रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर, सिंगल-पीस सीट सारखी वैशिष्ट्ये मिळतात. बाईकचा लूक सुद्धा अतिशय स्पोर्टी असल्याने तरुणांना या बाईकची चांगलीच भुरळ पडणार आहे.

पेट्रोल मोडवर ती 65 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. 2 किलो CNG आणि 5 लिटर पेट्रोल टाकल्यास तुम्ही या बाईकवरून 330 किलोमीटर प्रवास आरामात करू शकणार आहात.1 किलो सीएनजी मध्ये (Bajaj CNG Bike) बजाज ची ही बाईक तब्बल 100 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करू शकते.

Bajaj CNG बाइकमध्ये 125 सीसी सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 9.5 पीएस पॉवर आणि 9.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. गाडीला 2-लिटर पेट्रोल रिझर्व्होअर आणि 2-लिटर सीएनजी टँक बसवण्यात आला आहे.

Bajaj CNG Bike

बजाज ने किंमत का कमी केली?

आजकाल पेट्रोल आणि इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल जास्त असल्याने त्याचाही परिणाम बजाजच्या सीएनजी बाईक विक्रीवर होतोय .योग्य सीएनजी पायाभूत सुविधांचा अभाव आणि सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांबद्दल लोकांच्या मनात असलेली कमी जागरूकता यामुळे बजाजच्या सीएनजी बाईकची विक्री पाहिजे तशी होताना दिसत नाही.

Bajaj कंपनीने एंट्री-लेव्हल NG04 ड्रम व्हेरिएंटची किंमत का कमी केली याबाबत कोणतीही स्पष्ट अशी माहिती दिली नाही, परंतु असं बोललं जातंय कि मागच्या काही दिवसात फ्रीडम 125 च्या विक्रीत घट झाल्याने कंपनीने असा निर्णय घेतला असावा.
आता कंपनीने बाईकची किंमत कमी केल्यानंतर आता तरी गाड्यांची विक्री वाढते का ते पाहायला हवं.

मार्च 2025 मध्ये 1,394 गाड्या विकल्या गेल्या. इतर बाईकच्या तुलनेत विक्रीचा हा आकडा खूपच कमी मानला जातो.बजाज सीएनजी बाईकच्या (Bajaj CNG Bike) मासिक विक्रीबद्दल सांगायचं झाल्यास, एप्रिल 2025 मध्ये फ्रीडम 125 च्या फक्त 993 गाड्यांची विक्री झाली होती.

Bajaj CNG Bike 2025 बजाज ची CNG बाईक ३ व्हेरियंट मध्ये येते, मात्र किंमतीतील हि कपात फक्त एंट्री-लेव्हल NG04 ड्रम व्हेरिएंटसाठी लागू आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर NG04 ड्रम व्हेरिएंटची किंमत 85,976 रुपयांपासून सुरू झाली आहे. त्यामुळे सीएनजी गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे पैसे आता वाचणार आहेत.

बजाजने भारतातील पहिली CNG बाईक असलेल्या Bajaj Freedom 125 ची किंमत 5000 रुपयांनी कमी केली आहे. देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Bajaj ने एक मोठा निर्णय घेतला आहे.

पर्यावरणदृष्ट्याही फायदेशीर

CNG हे इंधन प्रदूषण कमी करते, त्यामुळे ही बाईक क्लीन आणि ग्रीन पर्याय मानली जात आहे. खासकरून शहरांमध्ये अशा गाड्यांची गरज मोठी आहे.

निष्कर्ष : अश्याप्रकारे जर तुम्ही बचत होऊन परवडणारी नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर Bajaj Freedom 125 CNG हा उत्तम पर्याय ठरू शकतो.किंमतही योग्य आणि आता तुम्हीही पेट्रोलचा ताण कमी करू शकता!

Leave a Comment