Bajaj Chetak 3001 Electric Scooter फक्त ₹99,990 मध्ये जबरदस्त रेंज आणि लुकमुळे बाजारात केली धूम

Bajaj Chetak 3001 Electric Scooter 2025: नवीन गाडी घ्यायचा विचार केला की बजाज कंपनी आपल्या लगेच डोक्यात येते कारण त्या कंपनीवर आपला विश्वास असतो. तुम्ही जर नवीन स्कूटर घ्यायचा विचार करत असाल तर लवकरच बजाज त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे, जी रोजच्या प्रवासासाठी एक उत्तम पर्याय असेल त्याची किंमत सुमारे १ लाख रुपये असू शकते.आज आपण पाहणार आहोत या स्कूटरची डिझाईन, किंमत आणि ह्या स्कूटरची कामगिरी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bajaj Chetak 3001 Electric Scooter 2025

शहरात राहणाऱ्या लोकांसाठी ही एक परवडणारी,टिकणारी आणि स्टायलिश पर्याय बनू शकते.स्कूटरदेखील उत्तम आहे कारण ती विश्वासार्ह बजाज ब्रँडची आहे. क्लासिक असूनही तिची रचना आधुनिक आहे, तिची कामगिरी उत्कृष्ट आहे आणि किंमत देखील वाजवी आहे.

बजाज कंपनी लवकरच त्यांच्या आयकॉनिक चेतक रेंजमध्ये बजाज चेतक ३००१ हे नवीन मॉडेल लाँच करणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे ही स्कूटर केवळ स्मार्ट तंत्रज्ञानाने सुसज्ज नसून, त्याची शैली आणि कामगिरी देखील तुम्हाला आवडणार आहे.

सध्या अनेक जण दैनंदिन प्रवासासाठी स्कूटर घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी बजाज चेतक ही स्कूटर मध्ये नेहमीच पुढे असणारी कंपनी आहे. सध्या नव्या मॉडेल आणि फीचर्स सह कंपनी एक नवीन स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे .आता ह्या येणाऱ्या नवीन चेतक स्कूटर बद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ.

स्कूटरच्या डिझाइनमध्ये मेटल बॉडी फिनिश उपलब्ध

Bajaj Chetak 3001 Electric Scooter

त्याचे एकूण वजन १२३ किलो आहे. समोर आणि मागे दोन्ही बाजूंना ९०/९०-१२ आकाराचे टायर दिले आहेत. हे स्पेसिफिकेशन शहरातील रहदारी आणि रस्त्यांसाठी परिपूर्ण बनवतात.त्याचा ग्राउंड क्लीयरन्स १६८ मिमी आणि व्हीलबेस १३५५ मिमी आहे,त्याची लांबी १९१४ मिमी, रुंदी ७२५ मिमी आणि उंची ११४३ मिमी आहे.

मेटल बॉडी फिनिश आहे, जी त्याला प्रीमियम लूक आणि फील देते.बजाज चेतक ३००१ ची डिझाइन कंपनीच्या सध्याच्या चेतक मॉडेलसारखी क्लासिक आणि मजबूत आहे.

Chetak स्कूटरची कामगिरी

तुम्ही ही स्कूटर एकदा चार्ज केली की ऑफिसला जाण्यासाठी ,बाजारपेठेत जाण्यासाठी किंवा वन डे पिकनिक साठी अशा तुमच्या दैनंदिन गरजा ती पूर्ण करू शकते. ह्या स्कूटीचा वेग पाहता ही स्कूटर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे ,जे कमी देखभालीची आणि विश्वासार्ह दैनंदिन प्रवास करतात.

बजाज चेतक ३००१ मध्ये ३.१ किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे, जी ६२ किमी/ताशी कमाल गती देण्यास सक्षम करते. यात सुमारे ३ किलोवॅटचा बॅटरी पॅक आहे. त्यामुळे स्कूटरच्या एका चार्ज मध्ये तुम्ही तुमची दैनंदिन कामे करू शकता.

स्कूटरची किंमत

कंपनी या आठवड्यात बजाज चेतक ३००१ लाँच करणार आहे. लाँचनंतर, त्याची रेंज, चार्जिंग वेळ, स्मार्ट फीचर्स आणि कनेक्टिव्हिटीबद्दल तपशीलवार माहिती उघड केली जाईल. जर तुम्ही चेतक २९०३ ची जागा शोधत असाल किंवा त्यापेक्षा थोडी जास्त फीचर्स असलेली स्कूटर हवी असेल तर चेतक ३००१ तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.बजाज चेतक ३००१ ची किंमत सुमारे १ लाख रुपये एक्स-शोरूम असण्याची अपेक्षा आहे.

निष्कर्ष : अशाप्रकारे आज आपण पाहिले की बजाज शोरूमने आणलेली chetak इलेक्ट्रिक स्कूटर याबद्दलची माहिती.आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

Leave a Comment