ChatGPT Study Mode: शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगतीचे अनेक मार्ग आपण पाहिले पण यावेळी आता तुमच्या मोबाईलवर आणि लॅपटॉप वर त्याचे आगमन झाले आहे.OpenAI ने नुकतंच भारतात ChatGPT Study Mode लाँच केलं आहे.
ज्यामुळे IIT, JEE, NEET यांसारख्या कठीण स्पर्धा परीक्षा आता घरबसल्या आणि AIच्या मदतीने शिकता येणार आहे.शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेचे चित्र आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे कारण आघाडीच्या टेक कंपन्यांनी आता एआयला विद्यार्थ्यांसाठी एक सक्षम सहकारी म्हणून सादर केले आहे.
ChatGPT Study Mode म्हणजे काय? एआय शिक्षण क्षेत्रात कसा बदल करेल?Study Mode कसे वापरायचे? आणि Study Mode ची वैशिष्ट्ये.आता आपण हे सर्व माहिती सविस्तर मध्ये जाणून घेऊ.
ChatGPT Study Mode म्हणजे नेमकं काय?
विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार वैयक्तिक मार्गदर्शन करणे,प्रश्नोत्तर समजावून सांगणे, नोट्स तयार करणे, MCQ सराव यासारख्या सेवा देतो.Study Mode ही ChatGPT ची एक विशेष सुविधा आहे.ChatGPT Study Mode मध्ये शिक्षकासारखा मार्गदर्शन करतो.
AI मुळे शिक्षण क्षेत्रात हे होणार बदल!
आज AI हा शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शाळा सगळ्यांसाठी एक स्मार्ट सहकारी बनला आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता हे फक्त तांत्रिक संकल्पना राहिले नाही तर आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रात AI चं आगमन हे एक मोठं क्रांतिकारक पाऊल मानलं जात आहे.
एआय मोठ्या समस्या सोडवू शकतात आणि भारतातील भाषिक विविधतेच्या आव्हानाला सामोरे जाऊ शकतात असे एआय विश्लेषक आणि ‘आरपीए२एआय रिसर्च’ (RPA2AI Research) या सल्लागार फर्मचे संस्थापक कश्यप कोम्पेला यांचे मत आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, मानवी शिक्षकांऐवजी एआय टूल्स निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, हेच खरे आव्हान असेल,चॅटजीपीटीसारखे एआय टूल्स प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक शिक्षण देऊ शकतात, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन देणे शक्य होत नाही. भारतात आजही काही ठिकाणी प्रशिक्षित शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे ही समस्या ए आय सोडवू शकते म्हणून एडटेक कंपन्यांनी सर्व शिक्षण आता डिजिटल केले आहे.
Read Also: Education foreain students: फॉरेन युनिव्हर्सिटीचे कॅम्पस आता मुंबईत
स्टडी मोड कसे वापरायचे?
- Study Mode वापरण्यासाठी फक्त OpenAI चं ChatGPT प्लॅटफॉर्म ओपन करा.
- “Study Mode” सिलेक्ट करा. हा मोड GPT-4 च्या अंर्तगत Pro/Plus सब्सक्रिप्शनमध्ये मिळतो.
- एकदा सुरू केल्यावर तुम्ही अभ्यासक्रम निवडू शकता, आणि लगेच AI तुमचं ट्यूटर बनतो.
Study Mode ची वैशिष्ट्ये
- वैयक्तिक मार्गदर्शन – AI प्रत्येक विद्यार्थ्याच्या शंका त्यांच्या शैलीनुसार सोडवतो आणि शिकवतो.
- 24/7 उपलब्धता – तुमचं शिक्षण तुमच्या वेळेनुसार उपलब्ध.
- Interactive Learning – तुमचे प्रश्न केवळ उत्तर न देता ,त्याची कारण, सोप्या भाषेत आणि उदाहरणासह समजावतो .
- Practice Questions आणि Mock Tests – विविध टॉपिक्सवर आधारित टेस्ट सत्र.
- टिप्स आणि ट्रिक्स – परीक्षेची योग्य तयारी, वेळेचं नियोजन आणि स्मरणशक्ती वाढवणारे उपाय.
निष्कर्ष: ChatGPT Study Mode: IIT, JEE, NEET ची तयारी आता AI सोबत सोपी आणि स्मार्ट या लेखांमध्ये आपण आज पाहिले की AI आता केवळ भविष्य नाही, तर शिक्षणाचा अविभाज्य भाग बनला आहे. ChatGPT Study Mode मुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणे आता सुलभ होणार आहे.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.
1 thought on “AI टूल्सने बदलेलं शिक्षण! ChatGPT Study Mode मुळे IIT, JEE, NEET ची तयारी सोपी”