Education foreain students: परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतं पण वित्तीय खर्च, वीजा प्रक्रियेतील गुंतागुंत, राहण्याची सोय, स्कॉलरशिपची कमतरता अशा अनेक गोष्टींनी अनेकांचं स्वप्न अर्धवटच राहत होता या सगळ्यांवर आता एक सकारात्मक पाऊल उचललं गेलं आहे. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न, जे तरुण काही कारणास्तव पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना आता मुंबईतच कमी खर्चात फॉरेन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधून शिक्षण घेऊ शकणार आहात.
भारत सरकार आणि काही आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था मिळून परदेशी शिक्षणासाठी सुविधा सुरू करत आहेत.
जागतिक दर्जाचं शिक्षण, अधिक संधी, आणि उज्वल करिअर यासाठी भारतातील हजारो विद्यार्थी दरवर्षी विविध देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी जातात. पण शिक्षण घेण्याच्या या प्रवासात अनेक अडचणी येतात यात विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केला आहे.देशातील विद्यार्थ्यांना मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.म्हणून आता तुमचे परदेशी शिक्षण घेण्याचे स्वप्न आता नक्कीच पूर्ण होणार आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि यूजीसीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत जगातील 10 मोठ्या विद्यापीठांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. ही घोषणा मुंबईत झालेल्या ‘मुंबई रायझिंग: क्रिएटिंग अ इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या कार्यक्रमात करण्यात आली.याचा फायदा फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच होणार असे नाही तर देशभरातील इतरही विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घेऊ शकतात.त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.
तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्रातील एज्यु-सिटीमध्ये म्हणजेच मुंबईत कॅम्पस उघडण्यासाठी पाच परदेशी विद्यापीठांना लेटर ऑफ इंटेंट (LOI) देण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 250 एकरवर ही एज्यु-सिटी बांधण्यात येत आहे.येथे जगातील 10 मोठ्या विद्यापीठांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. बहुतेक विद्यापीठे जगातील टॉप 100 रँकिंगमध्ये आहेत. हे सर्व राष्ट्रीय शिक्षण धोरणमुळे शक्य झाले आहे.आतापर्यंत 9 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यास मान्यता मिळाली आहे आणि लवकरच आणखी 6 विद्यापीठे सामील होतील. हे शिक्षण परदेशापेक्षा 30टक्क्यांनी स्वस्त असेल.
पाच परदेशी विद्यापीठांना मुंबईत कॅम्पस
1.इलिनॉय युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, यूएसए : आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे विद्यापीठ भारतात पदवी देणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ ठरणार आहे.
2.इन्स्टिट्यूटो युरोपियो डी डिझाइन, इटली : हे युरोपमधील एक प्रीमियम डिझाइन विद्यापीठ आहे. हे जगभरातील नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये समाविष्ट आहे.
3.स्कॉटलंडमधील अॅबरडीन विद्यापीठ : स्कॉटलंडमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ म्हणून स्कॉटलंडच्या अबर्डीन विद्यापीठाची ओळख आहे.मुंबईत या विद्यापीठाचे कॅम्पस ओपन केले जाणार असून हे भारतात कॅम्पस उघडणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ बनले आहे.
4.वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या टॉप ग्रुप ऑफ 8 चा भाग असणारे हे विद्यापीठ भारतात कॅम्पस ओपन करणार आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना विज्ञान, अभियांत्रिकी आणि उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
5.युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनायटेड किंग्डम : रसेल ग्रुपचे सदस्य असलेले आघाडीचे संशोधन विद्यापीठ म्हणून ही फॉरेन युनिव्हर्सिटी संपूर्ण जगभरात ख्यातनाम आहे. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना एआय, सायबरसुरक्षा, व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सर्जनशीलता या विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील.
फायदा कोणाला होणार ?
- आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील हुशार विद्यार्थी.
- शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन शोधणारे पालक.
- पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी.
- शिष्यवृत्तीच्या शोधात असणारे विद्यार्थी.
निष्कर्ष: नव्या सुविधा, सरलीकृत प्रक्रिया आणि सरकारचा सक्रिय सहभाग यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. शिक्षणाच्या या नव्या वाटचालीसाठी ही एक दिलासादायक सुरुवात मानली जात आहेआता परदेशी शिक्षणाचं स्वप्न फक्त स्वप्न न राहता, प्रत्यक्षात उतरणार आहे. आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.