Free Laptop Scheme 2025: कामगार मुलांसाठी सुरू झाली मोफत लॅपटॉप योजना, 50% पेक्षा जास्त मार्क असतील तर त्वरित करा अर्ज

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Free laptop schemes 2025: कोणत्याही ऋतूमध्ये बांधकाम कामगारांना आपले कुटुंब चालवण्यासाठी कामावर जावे लागते .एवढा संघर्ष करूनही त्यांना समाजात योग्य स्थान आणि योग्य वागणूक दिली जात याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकार ने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मोफत लॅपटॉप योजना सुरू केली .आज आपण पाहणार आहोत या योजनेसाठी कुठे आणि कसा अर्ज करावा ,त्यासाठी लागणारी पात्रता आणि कागदपत्र व त्यामुळे होणारे फायदे.

राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.बांधकाम कामगारांच्या अनुषंगाने राज्य सरकार व केंद्र सरकार नेहमीच विचार करत असतात. त्यासाठी त्यांना आर्थिक अनुदान म्हणून शिक्षणासाठी मोफत लॅपटॉप मिळणार आहे.जाणून घेऊया त्याबद्दलची संपूर्ण माहिती.

काय आहे ही योजना ?

राज्य सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी डिजिटल पाठबळ देणं. या अंतर्गत निवडक पात्र विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वितरित करण्यात येणार आहेत. म्हणजे आता कोणताही विद्यार्थ्याचा अभ्यास फक्त मोबाईलवर किंवा कागदावरच मर्यादित राहणार नाही

आजच्या डिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या वाटा उघडणं गरजेचं झालं आहे. ऑनलाईन क्लासेस, प्रोजेक्ट्स, अभ्याससामग्री या सगळ्याच गोष्टी लॅपटॉप आणि इंटरनेटशिवाय अपूर्ण आहेत. पण अजूनही आपल्या समाजात असे अनेक होतकरू विद्यार्थी आहेत, जे फक्त आर्थिक अडचणींमुळे या साधनांपासून वंचित राहतात. याच पार्श्वभूमीवर, बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सुरू झालेली ‘मोफत लॅपटॉप योजना’ ही खरंच एक आशेची किरण आहे.

बांधकाम कामगार फ्री लॅपटॉप योजना

Free laptop schemes बांधकाम कामगारांच्या मुलांचा विकास होण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.एवढेच नाही तर त्यांना आता सर्व शिक्षणही जणू मोफतच होणार आहे. याचाच लाभ घेऊन त्यांची मुले मोठ मोठी पदे गाठून पुढील पिढ्यांना प्रेरणा देतील.अशी कुठलीहि इमारत नसेल जी बांधकाम कामगाराच्या योगदानाशिवाय तयार झाली असेल.

हे काम त्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून करावे लागते. त्यांचे हे कष्ट त्यांना मिळणाऱ्या रोजगारापेक्षा अधिक असते.केव्हा कोणता अपघात होईल हे सांगता येत नाही.आजच्या या डिजिटल युगामध्ये मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉप सारख्या वस्तू असणे काळाची गरज बनली आहे. राज्यसरकारने कामगाराच्या पाल्यासाठी योजनेचे अर्ज हे 1 जून पासून भरण्यास सुरुवात केली आहे, शेवटची तारीख हि 31 जुलै आहे.

योजनेचे होणारे फायदे

शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी पुस्तके घेण्याची गरज नाही कारण लॅपटॉप वरच ते पुस्तक ऑनलाइन वाचू शकतील.लॅपटॉप मध्ये अभ्यासक्रमाचे आवश्यक ते ॲप घेऊन चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतील. या योजनेअंतर्गत राज्य सरकार बांधकाम विभागामार्फत या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणार आहे.हे लाभार्थी लॅपटॉपचा उपयोग करून त्यांचे शिक्षण ऑनलाईन पूर्ण शकतील.

योजनेचे उद्देश

कामगारांच्या पाल्यांना चालू घडामोडींचा आढावा लॅपटॉप वर घेता येईल ज्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना याचा लाभ होईल.लॅपटॉप चा वापर करून ते त्यांचे ऑनलाइन शिक्षण पूर्ण करू शकतील यामुळे बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. तसेच जर ऑनलाईन कोचिंग क्लासेस त्यांना करायचे असतील तर ते लॅपटॉपच्या मदतीने करू शकतात.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • बोनाफाईड सर्टिफिकेट
  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • कामगारांचे आणि त्याच्या पाल्याचे आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला

कोण पात्र आहे?

  1. पालक बांधकाम कामगार असावा आणि त्याची सरकारी नोंदणी झाली असावी
  2. मुलं सध्या शाळा/कॉलेजमध्ये शिकत असावीत (१०वी, १२वी, डिप्लोमा, डिग्री इ.)
  3. शैक्षणिक दस्तऐवज, आधार कार्ड, आणि कामगार प्रमाणपत्र लागेल

मित्रांनो या योजनेचे लाभार्थी दहावी उत्तीर्ण असावा आणि दहावीत 50% पेक्षा जास्त मार्क असतील तरच मोफत लॅपटॉप मिळणार आहे. ज्या अर्जदाराच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेचा लाभ हा कामगार परिवारातील फक्त दोनच मुलांना घेता येणार आहे.

बांधकाम कामगार फ्री लॅपटॉप योजनेसाठी अर्ज कसा करावा

या योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशल वेबसाइट वर विजिट करायचे आहे नंतर तो अर्ज व्यवस्थित वाचा नंतर बांधकाम कामगार आणि त्याच्या पाल्याची सर्व माहिती भरा.

अर्जासोबत मागण्यात आलेले आवश्यक कागदपत्र जोडून ती फाईल घेऊन तुमच्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करा. नंतर तुमच्या अर्जाची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पडताळणी केली जाईल. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला मोफत लॅपटॉप दिला जाईल.

निष्कर्ष: अशाप्रकारे आपण पाहिले की कामगार मुलांसाठी मोफत लॅपटॉप योजना ही केवळ सरकारी योजना नाही, तर गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचा एक खरा हातभार आहे. ज्यांच्याकडे साधनं नाहीत, पण शिकण्याची जिद्द आहे – अशा मुलांसाठी हा लॅपटॉप म्हणजे आशेचा किरण आहे.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group