Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, ऑक्टोबरचा ₹1500 हप्ता उद्यापासून खात्यात जमा

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता उद्यापासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

सर्व लाभार्थ्यांना निधी थेट खात्यात जमा होणार

आदिती तटकरे यांनी सांगितलं की पात्र महिलांना निधी मिळण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. बँक खात्यात पैसे थेट जमा होणार असल्याने कोणत्याही केंद्रात जाऊन प्रक्रिया करण्याची गरज नाही. सरकारचं उद्दिष्ट प्रत्येक पात्र महिलेला योग्यवेळी आर्थिक मदत पोहोचवणं आहे.

ई-केवायसी प्रक्रिया 18 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करा

योजनेचा लाभ अखंड सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यावश्यक आहे. महिलांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती अपडेट करावी. या प्रक्रियेत आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की, 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास पुढील हप्ता थांबू शकतो.

Read Also: Maharashtra Board SSC HSC Exam 2026 चे Time Table जाहीर, विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाची पाऊल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक आणि सामाजिक बळ देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी दिला जातो. तसेच, शेतकरी महिलांना ज्यांना पीएम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळतो, त्यांना दरमहा 500 रुपये मिळतात. या योजनेंमुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना वाढत आहे.

वेळेत प्रक्रिया पूर्ण करा आणि हप्ता निश्चित करा

सरकारने लाभार्थ्यांना आवाहन केलं आहे की वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि आपली माहिती तपासा. चुकीची माहिती दिल्यास निधी थांबण्याची शक्यता असते. म्हणून आधार आणि बँक माहिती काळजीपूर्वक तपासूनच ई-केवायसी करा.

डिस्कलेमर:सरकारच्या या निर्णयामुळे हजारो महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता खात्यात जमा होण्याने महिलांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल पडले आहे.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group