Mukhyamantri Bal Ashirwad Yojana: महाराष्ट्र सरकार राज्यात आणि देशात वर्षाला नवीन नवीन योजना राबवीत असते. त्यामुळे राज्यातील महिलांना थोडीफार का होईना आर्थिक मदत मिळते. त्यातून त्या वैयक्तिक गरजा भागू शकतात त्यामुळे महिलांचे कुटुंबात एक अस्तित्व तयार झाले आहे. म्हणून महिला ह्या अशा नवीन योजनेमुळे अतिशय आनंदी असतात.
सरकार अनेक योजना राबवत आहे, जसे की कामगारांकरिता बांधकाम कामगार योजना, शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या नुकसान भरपाई साठी विविध योजना राबवत असते जेणेकरून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. आता सोशल मीडियावर आणखी एक नवीन योजना आली आहे आणि तिची चर्चा सगळीकडे जोरदार रंगत आहे.
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना जाणून घेऊ ही योजना आहे तरी काय?
महाराष्ट्र सरकार राज्यातील निराधार, अनाथ आणि पालक नसलेल्या मुलांना त्यांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण,अन्न ,वस्त्र,निवारा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलांना महिन्याला 4,000 आर्थिक मदत दिली जाणार आहे.
या योजने मागचे सत्य
ही योजना यापूर्वी महाराष्ट्र सोडून इतर राज्यात राबवली होती.आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना साठी अर्ज सुरु झाले आहेत. या योजनेचे अर्ज जुलै 2025 पासून महाराष्ट्रात सुरु झाले असून हे अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या तहसील मध्ये मिळतील. तसेच योजनेचा अर्ज भरून हा कागदपत्रासह जिल्हा बाल संरक्षण युनिट कडे सबमिट करावा.
Read Also: PM Awas Yojana 2025: ₹1.20 ते ₹2.50 लाख पर्यंत घरकुलसाठी मदत
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक
- मुलाचे वय १८ वर्षांखाली असावे.
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे बंधनकारक
- मुलाचे आई-वडील दोघेही निधन पावलेले असावेत किंवा मुलगा/मुलगी पूर्णपणे निराधार असावी.
आर्थिक मदत किती मिळणार?
- ही मदत मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत किंवा तो स्वावलंबी होईपर्यंत मिळणार आहे.
- पात्र मुलाला दरमहा 4,000 रुपये सरकारकडून थेट खात्यात येणार आहेत.
निष्कर्ष: या लेखात आपण निराधारांसाठी राबवलेली मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या योजनेची माहिती पाहिली. मागच्या वर्षी या योजनेच्या महाराष्ट्रात खूप अफवा सोशल मीडियावरती येत होत्या. बरीच खोटी माहिती सुद्धा पसरली होती. पण सरकारने आता खरंच ही योजना सुरू केली असून त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.
खरंच ही योजना नावाप्रमाणेच निराधार विद्यार्थ्यांसाठी आशीर्वादाप्रमाणे असणार आहे. या योजनेमुळे एखाद्या मुलाला आधार मिळू शकतो.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.