TVS Apache RR 310: टीवीएस अपाचे आरआर 310 ही एक अशी स्पोर्ट्स बाइक आहे जी पाहण्यास आणि चालवण्यास दोन्ही आकर्षक आहे. शहरातल्या रस्त्यांवर जिथे गर्दी जास्त, तिथेही तिचा कंट्रोल उत्तम राहतो, तर ट्रॅकवर वेग घेताना बाइकला स्थिरता आणि स्टॅबिलिटी मिळते. तिचा एयरोडायनामिक डिझाईन आणि स्टायलिश विंगलेट्स हे उच्च वेगावर राइडिंग करताना बाइकला मजबुती देतात आणि राइडिंगचा मजा अजूनच वाढते.
दमदार फीचर्स आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी

टीवीएस अपाचे आरआर 310 मध्ये 312.2 सीसी रिव्हर्स इनलाइन DOHC इंजिन आहे, जे 37.48 बीएचपी पॉवर आणि 29 एनएम टॉर्क निर्माण करते. यात स्लिपर क्लच आणि 6-स्पीड गियरबॉक्स आहे, ज्यामुळे गियर बदलणे सहज आणि सुरळीत होते. बाइकमध्ये चार राइडिंग मोड्स आहेत ज्यामध्ये ट्रॅक, स्पोर्ट, अर्बन आणि रेन हे शामिल आहेतजे कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात.
फ्रंटमध्ये KYB इनव्हर्टेड फोर्क आणि रियरमध्ये मोनोशॉक सस्पेंशन आहे. ब्रेकिंगसाठी ड्युअल चॅनेल ABS आणि रियर व्हील लिफ्ट-ऑफ प्रोटेक्शनसारखे सुरक्षा फीचर्स आहेत. बाइकच्या डिझाईनमध्ये रॅम-एअर इंटेक, गिल वेंट्स आणि विंगलेट्स आहेत, जे हाय स्पीडवरही बाइकला स्थिर ठेवतात. मिशेलिन रोड 5 टायर्स उत्तम ग्रिप आणि कॉर्नरिंगसाठी वापरले आहेत.
Read Also: Mahindra Thar Roxx SUV: दमदार फीचर्स, इंजिन स्पेसिफिकेशन्स आणि मायलेजसह प्रीमियम ऑफ-रोड अनुभव
स्मार्ट कनेक्टिव्हिटी
टीवीएस अपाचे आरआर 310 मध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत, ज्यामुळे राइडर आपल्या मोबाईलशी बाईक कनेक्ट करून कॉल, मेसेज, ट्रॅकिंग आणि नेव्हिगेशनसह अनेक माहिती थेट बाईकच्या डिस्प्लेवर पाहू शकतो.
LED लाइट्स आणि स्टाइल
बाइकमध्ये फुल LED हेडलाइट्स, DRLs आणि टेललाइट्स आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी राइड सुरक्षित होते आणि बाइकची स्टायलिश लुक अधिक आकर्षक बनवते.
माइलेज आणि परफॉर्मन्स
अपाचे आरआर 310 चे ARAI माइलेज सुमारे 34.7 किमी/लीटर आहे. रिअल-लाइफ कंडिशन्समध्ये हे 33 किमी/लीटर पर्यंत अनुभवता येऊ शकते.
किंमत पण बजेटमध्ये

या बाइकची एक्स-शोरूम किंमत ₹2,77,999 पासून ₹3,37,000 पर्यंत आहे, जी वेरिएंट आणि फीचर्सवर अवलंबून बदलते, या बाईक्सच्या सर्व फीचर्स ला अनुसरून पाहिले तर ही बाईक यांच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे जे स्पोर्ट रायटिंग मध्ये इंटरेस्टेड आहेत.