Diesel Petrol ban new rule: केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशात प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सतर्क असते त्यासाठी विविध उपाय योजना करत आहेत. याच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे जो सरळ वाहन चालकांवर परिणाम करणार आहे.1 जुलै 2025 पासून काही विशिष्ट प्रकारच्या गाड्यांना पेट्रोल व डिझेल मिळणार नाही असा निर्णय लागू करण्यात येणार आहे. जाणून घेऊ कोणत्या क्षेत्रात हा नियम लागू होणार आहे.
कोणत्या गाड्यांना नकार?
एक जुलैपासून लागू होणाऱ्या नव्या नियमानुसार जर तुमच्या गाडीचे PUC (Pollution Under Control) प्रमाणपत्राची मुदत संपली असेल तर तुम्हाला पेट्रोल पंपावरून डिझेल व पेट्रोल मिळणार नाही.
दिल्ली आणि एनसीआर परिसरात 1 जुलै पासून या नव्या नियमांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.सीएक्यूएम (Commission for Air Quality Management) ने असे जाहीर केले आहे. एक ठराविक कालावधी ओलांडलेल्या जुन्या गाड्यांना पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल मिळणार नाही.वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी हा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक वाहनचालक PUC प्रमाणपत्र कडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. आता या निर्णयामुळे लोकांना नियमित PUC काढणे बंधनकारक होणार आहे. वायु प्रदूषण कमी करणे आणि नागरिकांना नियमितपणे आपल्या गाडीच्या प्रदूषण चाचण्या करून घेण्यास प्रवृत्त करणे हा या निर्णया मागील उद्देश आहे.
ट्रॅक कसे होणार?
आतापर्यंत 3.63 कोटींपेक्षा अधिक वाहनांची माहिती तपासली गेली असून, त्यात 4.90 लाख गाड्या EoL म्हणून नोंदवल्या गेलेल्या आहेत.कॅमेऱ्यांच्या मदतीने रिअल टाइममध्ये वाहनांची तपासणी केली जाणार आहे.दिल्लीतील सुमारे 500 पेट्रोल पंपांवर ANPR कॅमेरे बसवले गेले आहेत. अशी माहिती सीएक्यूएम सदस्य डॉ. वीरेंद्र शर्मा यांनी दिली.
नियम नाही पाळले तर?
वाहनांना इंधन न देण्याबाबत पेट्रोल पंपाला चेतावणी दिली आहे ज्या वाहनांची नंबर प्लेट ANPR कॅमेरा स्कॅन करतो आणि ती ‘VAHAN’ डेटाबेसशी जुळवतो जर गाडीने तिची मुदत ओलांडली असेल तर ती EoL म्हणून नोंदली जाते. त्या गाडीची माहिती एजन्सीजकडे पाठवली जाऊन गाडी जप्त होऊ शकते आणि स्क्रॅपिंगची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
आता डिजिटल प्रणाली लागू केली गेली असून वाहन मालकांना वेळेत कल्पना मिळेल आणि चुकीचे वाहन पेट्रोल पंपावर पोहोचले तर डिझेल व पेट्रोल मिळणार नाही. दिल्ली आणि NCR मध्ये हवा प्रदूषित होण्यामागे जुन्या वाहनांचे मोठे योगदान आहे त्यामुळे BS स्टॅंडर्ड च्या आधारे अशा गाड्यांना हळूहळू रस्त्यावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व पेट्रोल पंप चालकांना सूचना देण्यात आल्यात की PUC दाखवल्याशिवाय कोणत्याही वाहनाला डिझेल व पेट्रोल देऊ नये ,जर कोणी नियम मोडल्यास संबंधित पेट्रोल पंपावर कारवाई केली जाईल.
कुठे सुरू होणार नियम?
1 नोव्हेंबर 2025 गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, सोनीपत.1 एप्रिल 2026 उर्वरित NCR .1 जुलै 2025 दिल्ली या ठिकाणी .ANPR डेटावर नजर ठेवून
नियम तोडणाऱ्या गाड्यांची माहिती मिळवतील व त्या पेट्रोल पंपांची नोंद करून जिथे नियमांचे उल्लंघन जास्त प्रमाणात होते
कठोर कारवाई निश्चित होईल.दिल्ली परिवहन विभागाने यासाठी 100 विशेष मॉनिटरिंग टीम्स नेमणूक केली आहे.डिझेल 10 वर्ष तर पेट्रोल 15 वर्ष इंधन प्रकारानुसार कमाल वापर ,जे वाहन या कालावधीपलीकडे गेले आहेत, त्यांना EoL म्हणून नोंदवलं जातं
नागरिकांनी काय करावे?
आपल्या गाडीचं PUC प्रमाणपत्र तपासून घ्यावे. जर ते कालावधी ओलांडलं असेल तर जवळच्या स्थानिक PUC सेंटरवर जाऊन नवीन प्रमाणपत्र घ्यावे. प्रमाणपत्र नेहमी गाडीत ठेवावे आणि पेट्रोल पंपावर दाखवण्यासाठी तयार ठेवावे.
निष्कर्ष: जर तुम्ही गाडी वापरत असाल तर तुमच्यासाठी हा खूप मोठा बदल आहे.वेळेवर PUC घेणे ही केवळ कायदेशीर आपली जबाबदारीच नाही, तर पर्यावरण संरक्षणाचीही जबाबदारी आहे. 1 जुलैनंतर जर हा त्रास टाळायचा असेल, तर आताच तयारीला लागा .आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.