WhatsApp AI Writing Help Feature: AI लिहिणार तुमचा मेसेज, व्हाट्सअप चे नवीन फीचर काय आहे हे फीचर जाणून घ्या लगेच

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp AI Writing Help Feature: व्हाट्सप्प हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग अॅप आहे. दैनंदिन जीवनात लाखो लोक WhatsApp च्या माध्यमातून संवाद साधतात. वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी WhatsApp सतत नवीन फीचर्स आणत असतो. यामधेच कंपनीने आता एक जबरदस्त फीचर लॉन्च केला आहे त्याचे नाव AI Writing Help विचार असे आहे.

हे फीचर खूप खास आहे कारण याच्या मदतीने तुम्ही तुमचे मेसेज पाठवण्याआधी त्यांना वेगवेगळ्या टोनमध्ये बदलू शकता. म्हणजेच, तुमचा साधा मेसेज AI च्या मदतीने फनी, प्रोफेशनल किंवा सपोर्टिव्ह स्टाईलमध्ये लिहून पाठवता येतो. यामुळे तुमचा मेसेज अधिक प्रभावी, मजेदार आणि प्रसंगानुरूप होतो.

WhatsApp Writing Help म्हणजे काय?

आजच्या काळात लोक आपले विचार मेसेजद्वारे मांडतात. पण कधी कधी साधा मेसेज कंटाळवाणा वाटतो किंवा समोरच्याला चुकीच्या टोनमध्ये पोहोचतो. हाच प्रश्न सोडवण्यासाठी WhatsApp ने Writing Help फीचर आणले आहे.

उदाहरणार्थ – तुम्ही लिहिलं “सोफ्यावर घाणेरडे सॉक्स ठेवू नका”. हा मेसेज थोडा कठोर वाटू शकतो. Writing Help त्याच वाक्याला मजेशीर शैलीत असे बदलेल “सोफ्याला सॉक्सचं स्मशान बनवू नका” किंवा “अरे सॉक्स हिरो, लॉन्ड्री बास्केट त्या दिशेने आहे!”. यामुळे मेसेज केवळ सूचना न राहता तो हलकाफुलका आणि हसतखेळत समोरच्यापर्यंत पोहोचतो.

Read Also: Google update: कॉल इंटरफेस अचानक वेगळा दिसू लागलाय? काय आहे हे अपडेट, लगेच जाणून घ्या

Writing Help फीचर कसं वापरायचं?

हे फीचर वापरणं खूप सोपं आहे आणि असं केल्याने तुमचा साधा मेसेज अधिक आकर्षक बनतो. हा फीचर कसं वापरायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप दिली आहे.

WhatsApp AI Writing Help Feature
Image credit: WABetaInfo
  • WhatsApp वर मेसेज टाईप करताना तुम्हाला नवीन पेन्सिल आयकॉन दिसेल.
  • त्या आयकॉनवर टॅप केल्यावर AI Writing Help सुरू होईल.
  • नंतर तुम्हाला Funny, Professional किंवा Supportive अशा पर्यायांमधून हवा तो टोन निवडता येईल.
  • तुम्हाला पसंत पडलेला मेसेज निवडा आणि पाठवा.

गोपनीयतेची काळजी कशी घेतली जाते?

WhatsApp ने यावेळी गोपनीयतेला विशेष महत्त्व दिलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे फीचर Meta च्या Private Processing तंत्रज्ञानावर चालतं.

  • WhatsApp किंवा Meta तुमचे मेसेज वाचू शकत नाहीत.
  • AI सुचवलेले पर्याय देखील सुरक्षित असतात.
  • सर्व मेसेजेस एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहतात.

म्हणजेच वापरकर्त्यांची माहिती पूर्णपणे खाजगी (Private) ठेवली जाते.

कुठे उपलब्ध आहे हे फीचर?

सध्या WhatsApp ने हे फीचर निवडक देशांमध्ये उपलब्ध केलं आहे आणि ते फक्त इंग्रजी भाषेत वापरता येतं. परंतु, कंपनी लवकरच हे फीचर इतर देशांमध्ये आणि इतर भाषांमध्येही आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय वापरकर्त्यांनाही निकट भविष्यात या सुविधेचा लाभ घेता येईल.

Writing Help फीचर का खास आहे?

  • साधा मेसेज अधिक आकर्षक बनतो
  • संवाद मजेशीर आणि सोपा होतो
  • व्यावसायिक टोनमध्ये मेसेज लिहिणं सोपं होतं
  • चुकीचा टोन समोरच्याला पोहोचत नाही
  • वापरण्यास खूपच सोपं

WhatsApp चं हे नवं AI Writing Help फीचर वापरकर्त्यांसाठी खूपच उपयुक्त आहे. यामुळे मेसेज लिहिणं अजून सोपं, स्मार्ट आणि मजेदार होणार आहे. पुढच्या काळात हे फीचर मराठीसह अनेक भाषांमध्ये आलं, तर संवाद साधण्याचा अनुभव अधिकच रंगतदार होईल.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group