Instagram reel: सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आहे. खासकरून रील्स या फिचरमुळे छोटे व्हिडिओज तयार करणारे क्रिएटर्स खूप प्रसिद्ध होत आहेत. अनेकांना हे समजत नाही की इन्स्टाग्रामवर 1000 व्यूज साठी किती पैसे मिळतात. खरोखर पाहता, इन्स्टाग्रामवर व्यूजमुळे थेट पैसे मिळत नाहीत, पण यामुळे तुमचा कंटेंट जास्त लोकांपर्यंत पोहचतो आणि ब्रँड डील्सच्या संधी निर्माण होतात.
थेट कमाईसाठी फिक्स्ड सिस्टीम नाही
इन्स्टाग्रामवर थेट पैसे मिळण्याची फिक्स्ड सिस्टीम नाही. यूट्यूबसारखे CPM बेसिसवर पैसे मिळत नाहीत. कमाई मुख्यत्वे ब्रँड स्पॉन्सरशिप, प्रमोशनल डील्स आणि अन्य मार्केटिंग ऑपोर्च्युनिटीवर अवलंबून असते. व्यूज, फॉलोअर्स, लाइक्स, कमेंट्स, शेअर्स यासारख्या एंगेजमेंट्स क्रिएटर्सच्या कमाईसाठी महत्वाचे घटक आहेत.
ब्रँड्सशी संपर्क कसा येतो
जेव्हा क्रिएटर्सचे फॉलोअर्स 10 हजारांपेक्षा जास्त होतात, तेव्हा ब्रँड्स थेट संपर्क साधू लागतात. जर तुमचे व्हिडिओ यूनिक, आकर्षक आणि एंगेजिंग असतील, तर कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या प्रमोशनसाठी पैसे देतात. रिल्सवर लोक जास्त लाइक, कमेंट किंवा शेअर करत असतील, तर ब्रँड त्यासाठी अतिरिक्त पैसे देतात.
सरासरी कमाई
सरासरी, 1000 व्यूजसाठी क्रिएटर्स 100 ते 200 रुपये मिळवू शकतात. मात्र, मोठ्या फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्ससाठी ही रक्कम खूप जास्त असू शकते. एंगेजमेंट रेट जितका जास्त, ब्रँड पेमेंट तितकी जास्त.
ब्रँडेड कंटेंट आणि मायक्रो-इन्फ्लूएन्सर्स
ब्रँडेड कंटेंटमध्ये, मायक्रो-इन्फ्लूएन्सर्स (1,000–10,000 फॉलोअर्स) एका पोस्टसाठी 5,000 ते 20,000 रुपये मिळवू शकतात. जर 1000 व्यूज असलेल्या रीलवर ब्रँड डील झाली, तर 10,000 रुपये सहज मिळू शकतात.