CBSE चा मोठा निर्णय: 2026 पासून 10वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा! विद्यार्थ्यांना मिळणार दुप्पट संधी आणि कमी ताण

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

CBSE ने विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी एक निर्णय घेतला आहे तो निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित आणि वेळेत होण्यासाठी शाळा शिक्षक आणि पालक यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील लवचिकता ,त्यांना सुधारण्याची संधी आणि त्यांचा मानसिक दबाव कमी करण्याच्या दृष्टीने घेतला आहे.CBSE म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (Central Board of Secondary Education) 2026 पासून एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांसाठी अभ्यासक्रम एकच असणार आहे. दोन्ही परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमांवर आधारित असेल तसेच दोन्ही परीक्षांसाठी परीक्षा केंद्र देखील एकच असेल.

परीक्षा अर्ज दाखल करतानाच दोन्ही परीक्षांचं शुल्क जमा करावं लागणार आहे. पहिल्या परीक्षेत कमी गुण पडल्यामुळे विद्यार्थी समाधानी नसतील तर त्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी म्हणून दुसऱ्यांदा परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान आयोजित केली जाईल. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पाच ते 20 मे मध्ये आयोजित केली जाईल.सीबीएसईनं तयार केलेल्या ड्राफ्ट नुसार सीबीएसईकडून दहावीची पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाईल.

नव्या नियमांनुसार अंतर्गत मूल्यमान वर्षातून एकदा आयोजित केली जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील पहिली परीक्षा देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दुसऱ्या परीक्षेत सहभाग हा इच्छेनुसार देण्यात येईल. पहिल्या परीक्षेत ज्यांना गुण कमी मिळालेत ते दुसरी परीक्षा देऊन गुण वाढवू शकणार आहेत.

विद्यार्थ्यांना होणारा फायदा

  • नवीन अभ्यासपद्धतीला साथ – ज्ञान केंद्रित व कौशल्याधारित शिक्षण घेता येईल.
  • स्कोअर सुधारण्याची संधी – जास्त गुण असलेली परीक्षा अंतिम धरली जाणार आहे.
  • अधिक लवचिकता – परीक्षेतील चुका सुधारण्याची संधी देण्यात येईल.
  • मानसिक शांतता – एकाच परीक्षेचा ताण नसणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई बोर्डातून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की दोन परीक्षा दिल्या नंतर कोणत्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरतील? तर ते अस की ,काही अडचणींमुळं दोन्ही पैकी एका परीक्षेत कमी गुण मिळाल्यास ज्या परीक्षेत गुण अधिक असतील त्यामधील गुण ग्राह्य धरले जातील.

निष्कर्ष: अशाप्रकारे शिक्षण क्षेत्रात लवचिकता आणण्यासाठी व विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.सीबीएसईच्या या निर्णयाचं विद्यार्थी आणि पालक वर्गातून कसं स्वागत केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group