ladki bahin yojana september installment date: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठीची मोठी योजना आहे. या योजनेत पात्र बहिणींना दरमहा ₹1,500 ची थेट मदत बँक खात्यात जमा केली जाते. लाखो बहिणी या योजनेचा लाभ घेत असल्याने प्रत्येक महिन्याला हाच प्रश्न पडतो हप्ता जमा झाला का? तर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना सप्टेंबर चा हफ्ता कधी जमा होणार।
Read Also: Ladki Bahin Yojana Helpline Number: पैसे बंद झाले किंवा तक्रार आणि मदतीसाठी करा हा एकच कॉल
ऑगस्ट हप्ता ११ सप्टेंबरपासून सुरू
सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचे पैसे थोडे उशिरात आले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते की तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला, मात्र पैसे लवकरच जमा होतील. ११ सप्टेंबरपासून काही जिल्ह्यांमध्ये ऑगस्टचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत, तर अजून काही भागात प्रक्रिया सुरू आहे
अनेक ठिकाणी महिलांना हप्ता मिळाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र अजून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही कारण पुढील काही दिवसांत उर्वरित रक्कम देखील जमा होणार आहे.
सप्टेंबर हप्ता कधी जमा होईल?
सप्टेंबर महिन्याचा हप्ता साधारणपणे ५ ते १० तारखेदरम्यान जमा होईल अशी अपेक्षा होती. पण ऑगस्टचे पैसे उशिरा आल्यामुळे सप्टेंबरचा हप्ता थोडा पुढे ढकलला गेला आहे. अशी शक्यता आहे की काहींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे जमा होतील.
Read Also: Ladki bahin Yojana पैसे बंद झालेत का? लगेच या 7 सोप्या स्टेप्स करून ₹1,500 चा हप्ता परत शुरू करा
पैसे तपासण्याची सोपी पद्धत
लाभार्थींनी आपले बँक खाते नियमित तपासावे. जर पैसे आले नसतील तर ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून स्थिती पाहता येईल. तसेच जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधूनही माहिती मिळवता येईल.
निष्कर्ष: सध्या परिस्थिती अशी आहे की ऑगस्टचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, पण अजून सर्वांच्या खात्यात आलेले नाहीत. सप्टेंबरचा हप्ता मात्र काही दिवसांतच जमा होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पात्र बहिणींनी संयम बाळगून आपले खाते तपासत राहणे महत्त्वाचे आहे.