Mahadbt Sheti Yojana: ट्रॅक्टर, पंप, यंत्रांसाठी मिळवा ५०% अनुदान, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Mahadbt Sheti Yojana: शेतीत आधुनिक यंत्रांचा वापर केल्याने वेळ, श्रम आणि खर्च वाचतो. शासनाकडून मिळणाऱ्या 50% पर्यंतच्या अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी आपली शेती अधिक कार्यक्षम करू शकतात. महाडीबीटी पोर्टलवरून प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे, घरबसल्या अर्ज करणं शक्य आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच अर्ज करा आणि आपली शेती आधुनिक बनवा.शेती अधिक आधुनिक, सुलभ आणि फायदेशीर व्हावी, यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत.

एक महत्त्वाची योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना, ट्रॅक्टर,पॉवर टिलर,पंपसेट,स्प्रेयर (Electric/Manual),थ्रेशर,मल्टिपर्पज यंत्र,बियाणे पेरणी मशीन शेतीच्या विविध प्रक्रिया यंत्रसामुग्री आणि प्रक्रिया यंत्रसामग्री खरेदीसाठी ५०% पर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी Mahadbt पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये अर्ज प्रक्रिया सोपी असून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते.

अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया:

  • महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या लिंकवर जाऊन ‘शेतकरी नोंदणी’ करावी लागते.
  • नोंदणी करताना नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बँक खात्याचे तपशील भरणे आवश्यक आहे.
  • शेतीचा तपशील (गाव, तालुका, ७/१२ उतारा) आणि आवश्यक यंत्रसामग्रीची निवड करावी लागते.
  • निवडलेल्या यंत्रासाठीचे अधिकृत कोटेशन पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे.

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. शेतकरी ओळख प्रमाणपत्र
  4. ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘Submit’ बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा.

अर्जाची स्थिती आणि मंजुरी प्रक्रिया

अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जदारास Application ID दिली जाते. याच ID च्या आधारे अर्जाची स्थिती वेळोवेळी पोर्टलवर लॉगिन करून तपासता येते. अर्जाची पडताळणी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात केली जाते. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की राज्य सरकारच्या योजनांसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.

Read Also: pm kisan beneficiary list 2025: २०वी हप्त्याची रक्कम खात्यात आली का?

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य धोरण

महाडीबीटी योजनांतर्गत अर्ज स्वीकारताना ‘First Come First Serve’ हे धोरण लागू केले गेले आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा,अन्यथा निधी कमी पडल्यास अर्ज प्रलंबित राहू शकतो.

रखडलेले अर्ज आणि निधीची अडचण

राज्यात सध्या कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी जवळपास 45 लाख अर्ज प्रलंबित आहेत. महत्त्वाचे म्हणजे यातील बरेच अर्ज निधीअभावी रखडले आहेत. त्यामुळे अर्जदारांनी अर्ज करून थांबू नये, तर वेळोवेळी अर्जाची स्थिती तपासावी आणि मंजुरीनंतरच यंत्र खरेदी करावी, अन्यथा अनुदान मिळणे कठीण होऊ शकते.

तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवा

ही योजना शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत पाऊल ठेवण्यासाठी मदत करणारी आहे. शेतकऱ्यांनी योग्य वेळ साधून अर्ज करावा, अर्जाच्या स्थितीवर लक्ष ठेवावे आणि अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाचे आवाहन आहे.

अर्जासाठी अधिकृत वेबसाइट लिंक

सूचना: या योजनेअंतर्गत यंत्र खरेदी करण्यापूर्वी अनुदान मंजुरी मिळालेली असावी, अन्यथा अर्ज फेटाळले जाऊ शकतात.

निष्कर्ष : शेतीत आधुनिक यंत्रांचा वापर केल्याने वेळ, श्रम आणि खर्च वाचतो. शासनाकडून मिळणाऱ्या 50% पर्यंतच्या अनुदानाचा लाभ घ्या आणि शेतकरी मित्रांनो आपली शेती अधिक कार्यक्षम बनवा.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group