New Time Table School 2025: नवे शैक्षणिक वर्ष, नवे नियम! शाळांचे वेळापत्रक आणि अभ्यासक्रम पूर्णपणे बदलणार

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

New time table school: उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे तसेच नवीन शैक्षणिक वर्ष ही चालू झाले आहे. या वर्षी शाळेची वेळ,सुट्टीची वेळ आणि आठवड्याचे वर्गाचे स्वरूप यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी हा मोठा बदल केला आहे. वेळापत्रकात काय बदल होणार आहे त्याबद्दल माहिती घेऊ.

New time table school

राज्यातील सर्व शाळा आता सुरू झाल्या आहेत.शाळा सुरू झाल्यानंतर आता शाळांच्या नियमांमध्ये काही बदल केले असून शाळांचे वेळापत्रक मध्येही काही बदल केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ही बदल करण्यात आला आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे..नवीन एज्युकेशन पॉलिसी नुसार पुस्तक देखील बदललेले आहेत हळूहळू टप्प्यानुसार आता ही पुस्तक बदलणार आहेत.

ही बातमी शिक्षकांसाठी ही महत्वाची आहे.
राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदापासूनच सुरू केली जाणार आहे.16/04/2025 पासून शासन निर्णयानुसार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2025- 26

यावर्षी फक्त पहिलीच्या वर्गासाठी नवीन शैक्षणिक धोरण चालू होणार आहे यानुसार पहिलीच्या वर्गासाठी नवीन अभ्यासक्रमाची ही यंदापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.आता सध्या 5 ऑक्टोबर 2017 च्या शासन परिपत्रकानुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विषयावर तासिका विभागणी होणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून टप्प्याटप्प्याने हे शैक्षणिक धोरण अमलात आणले जाणार आहे.

पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी ही नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या कडून इयत्ता पहिली व दुसरीसाठी सर्व माध्यमांच्या शाळेसाठी सुधारित शालेय वेळापत्रक जाहीर केले आहे.नवीन वेळापत्रकानुसार शालेय वर्षामध्ये एकूण 365 दिवसांपैकी 210 दिवस अध्ययन-अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले असून, यासाठी एकूण 35 आठवड्यांचा अभ्यासकाल निश्चित केला आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 18 जून 2025 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार हे वेळापत्रक नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले असून, त्यात विषयवार तासिकांची स्पष्ट विभागणी करण्यात आली आहे. उरलेल्या दिवसांमध्ये परीक्षा, मूल्यांकन व सहशाळेचे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे रविवार व इतर सुट्ट्या मिळून एकूण 128 दिवस सुट्टीचे ठरवण्यात आले आहेत.यामध्ये परीक्षा व अनुषंगिक कृतींसाठी 14 दिवस, तर सहशालेय उपक्रमांसाठी 13 दिवस निश्चित करणार आहेत. शालेय जीवन अधिक गुणवत्ता व शिस्तबद्ध व्हावे, या हेतूने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षण विभागाने अलीकडेच स्पष्ट केले आहे.

या नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे सर्व माध्यमांच्या शाळांसाठी एकसंघ अभ्यासाचा आराखडा लागू करण्यात येणार आहे असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शाळांचा शिक्षणाचा काळ एकसारखाच ठेवण्यात आला असून, त्यात फक्त परिपाठ, मधली सुट्टी व समृद्धीकरण तासिका यामध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार थोडाफार फरक असू शकतो असे शासन परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकात विषयांचे योग्य समायोजन केले असून, गणित, पर्यावरण, भाषा, आरोग्य शिक्षण व कलाशिक्षण यांना समप्रमाणात वेळ देण्यात आला असल्याचे वेळापत्रकातून स्पष्ट होत आहे.

पालकांची भूमिका

शाळांना नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी तात्काळ करावी लागणार आहे. पालकांनी देखील याची माहिती घेऊन आपल्या मुलांच्या दैनंदिन वेळापत्रकात आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे.सुरुवातीला या बदलाशी जुळवून घेणे थोडे अवघड जरी वाटलं, तरी दीर्घकाळात याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या तिघांनीही सहकार्य केल्यास हे वेळापत्रक यशस्वीरीत्या राबवता येईल.

निष्कर्ष:अश्याप्रकारे शिक्षणाच्या गतीला योग्य दिशा देणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group