Tata Harrier EV लाँच झाली! 622 किमी रेंज, लक्झरी फीचर्स आणि जबरदस्त QWD टेक्नॉलॉजीसह खरेदीसाठी सज्ज

Tata Harrier EV: टाटा मोटर्सनं अखेर एक धमाका केलाच!दमदार परफॉर्मन्स, आकर्षक लुक्स आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने सजलेली ही गाडी SUV चाहत्यांसाठी भारतीय बाजारात सज्ज आहे .जर तुम्ही एक प्रीमियम, स्टायलिश आणि लॉन्ग-रेंज EV SUV शोधत असाल, तर Harrier EV तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल. टाटाची ही कामगिरी लक्ष वेधनीय आहे.चला तर पाहू ही कार आपल्यासाठी कशी उपयुक्त ठरेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Harrier EV कोण विकत घेईल

  • जे वाहनचालक कारमध्ये लूक आणि फीचर्सला महत्त्व देतात, त्यांच्यासाठी तर ही गाडी खूपच खास आहे.
  • जे भविष्यकाळाचा विचार करत आहेत.
  • ज्या लोकांना SUV आवडते पण पेट्रोल-डिझेलपासून सुटका हवी आहे.
  • जास्त काळासाठी इन्व्हेस्टमेंट आणि कमी मेंटेनन्स याचे पर्याय शोधणारे वाहन खरेदीदार
  • पर्यावरणाचे नियम अवलंबणारे SUV प्रेमी
  • सुरक्षित, मोठ्या रेंजची इलेक्ट्रिक गाडी हवी असलेले कुटुंब
  • अशांसाठी ही गाडी फायदेशीर आहे.

सुरक्षिततेसाठी एक विश्वासार्ह

Tata Harrier EV

आपल्याला आपल्या कुटुंबासोबत लांबचा प्रवास करायची आवड असेल किंवा कधीही शहरात फिरायला जायला आवडत असेल , तर आपल्या प्रवासात सोयी आणि आरामाचे महत्व आहे. त्यासाठी एक परफेक्ट कारची निवड अत्यंत महत्त्वाची आहे, जी तुमचा प्रवास आनंददायी बनवेल.सुरक्षा आणि विश्वसनीयता उत्तम कॉम्बिनेशन आहे.

या SUV ला Harrier EV टक्कर देणार

Harrier EV आता भारतीय बाजारात Mahindra XEV 9e, Tata Curvv EV आणि Hyundai Creta EV यासारख्या SUV ला थेट स्पर्धा देणार असून QWD प्रणाली आणि ऑफ-रोड मोड्समुळे ही गाडी शहरांबरोबरच भक्कम भागांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करू शकते.

तुमच्या बजेटनुसार किंमत आणि व्हेरियंट व चार्जिंग

उपलब्ध व्हेरियंट्समध्ये Harrier EV Adventure 65, Adventure S 65, Fearless Plus 65, Fearless Plus 75 आणि Empowered 75 यांचा समावेश आहे.Tata Harrier EV ची किंमत ₹21.49 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप-एंड Empowered 75 व्हेरियंटची किंमत ₹27.49 लाख आहे. सोबत होम चार्जिंग सोल्युशनही टाटाकडून दिलं जाईल.Harrier EV ला फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. म्हणजेच केवळ 30-40 मिनिटांत 80% चार्ज होऊ शकतो.

बॅटरी आणि रेंज

ARAI प्रमाणित रेंज 622 किमी असून, रिअल-वर्ल्ड रेंज 480 ते 505 किमी पर्यंत आहे.ही गाडी केवळ 6.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ता. वेग पकडते. यातील मोठ्या बॅटरी व्हेरियंटमध्ये 390bhp पॉवर आणि 504Nm टॉर्क आहे.Tata Harrier EV मध्ये दोन बॅटरी चे पर्याय दिले आहेत — 65kWh आणि 75kWh.

महत्त्वाच्या तारीख

  • 4 जून 2025: Auto Expo 2025 मध्ये Harrier EV चे प्रदर्शन होईल.
  • 11 जून 2025: V2L आणि V2V चार्जिंग डिटेल्स जाहीर होणार आहे.
  • 23 जून 2025: अधिकृत लॉन्च, किंमती जाहीर होईल.
  • 24 जून 2025: भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लक्झरी फीचर्स आणि QWD टेक्नॉलॉजी

JBL डॉल्बी अ‍ॅटमॉस साऊंड सिस्टम, Summon Mode, Auto Park Assist, 540 डिग्री कॅमेरा व्ह्यू, Transparent Mode, Blind Spot मॉनिटरिंग, ई-IRVM, Boss Mode सीट्स, Panoramic सनरूफ, Dual-Zone क्लायमेट कंट्रोल, वायर्डलेस Apple CarPlay आणि Android Auto, iRA कनेक्टेड फीचर्स, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, रियर सनशेड आणि Type-C फास्ट चार्जिंग पोर्ट यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील दिली आहेत.

Harrier EV मध्ये एक प्रगत 14.53-इंच Samsung QLED टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. .ही SUV भारतातील पहिली अशी इलेक्ट्रिक गाडी आहे जिच्यामध्ये Quad Wheel Drive (QWD) म्हणजेच चारही चाकांवर पॉवर देणारी ही प्रणाली आहे.

निष्कर्ष: अशाप्रकारे जर तुम्हाला स्टायलिश, स्मार्ट आणि विश्वासार्ह SUV हवी असेल, तर टाटाची ही Harrier EV नक्कीच एक प्रीमियम पर्याय असेल.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment